लोकसभेच्या निकालानंतर महायुती आणि मविआत फुट?

लोकसभा निवडणूका पार पडल्या. इतक्यात नव्या निवडणूका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यात. विधान परिषदेच्या चार जागा रिक्त झाल्यात. या जागेंवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता मात्र राज ठाकरेंनी गेअर बदलल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील दोन्ही […]

Read More

येतोय कडक लॉकडाउन

तीन आठवड्याचा कडक  लॉकडाउन लावण्याचा   महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे.  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांनी या संबंधात विचार करण्यासाठी उद्या  एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही  बैठकीला बोलावले आहे.  आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री  विजय वडेट्टीवार यांनीही कडक लॉकडाउनचे संकेत दिले.   सध्या  कडक निर्बंध आणि  शनिवार-रविवार विकेंड लॉकडाउन असतानाही करोनाचे  पेशंट वाढत आहेत.  […]

Read More

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

       अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे  हादरलेल्या राष्ट्रवादीने काही तासातच स्वतःला  सावरले आहे.  शरद पवारांनी झटपट  निर्णय केला. त्यांनी आपले सर्वात विश्वासू  सहकारी  दिलीप वळसे पाटील यांना निवडले. दिलीप वळसे-पाटील हे  नवे गृहमंत्री म्हणून उद्या म्हणजे  सोमवारी  सकाळी शपथ घेतील.    त्यांच्याकडचे उत्पादन शुल्क खाते  अजित पवारांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात […]

Read More

अनिल देशमुखांचा अखेर राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. द्यावा लागला. देशमुख ७० वर्षे वयाचे आहेत. विदर्भातले आहेत. गेली ४० वर्षे राजकारणात आहेत.  ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले. काळा डाग नव्हता. मात्र  ह्या वयात त्यांच्यावर ही नामुष्की यावी ही शोकांतिकाच म्हटले पाहिजे. नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. पण  मुंबई हायकोर्टाने  चौकशी लावली […]

Read More

पुन्हा येतोय लॉकडाउन?

      मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  पुन्हा राज्यावर लॉकडाउन लादण्याच्या विचारात आहेत.  येत्या  १  एप्रिलला त्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.  तिच्यात लॉकडाउन जाहीर होण्याची जोरदार चर्चा आहे.  राज्यात करोनाचे पेशंट सारखे वाढत आहेत. करोनाची गंभीर परिस्थिती असलेल्या देशातील  १० जिल्ह्यांपैकी   ८ जिल्हे  महाराष्ट्रातले आहेत. आज आपल्या राज्यात  साडे तीन लाख पेशंट आहेत.   लोक नियम पाळत नाहीत त्यामुळे  […]

Read More

पवारांच्या पोटदुखीने सरकारवरचे संकट लांबले

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या अचानक उमललेल्या पोटदुखीने  महाआघाडी सरकारवरचे संकट  लांबले.    बुधवारी त्यांच्या पित्ताशयावर  शस्त्रक्रिया आहे.  रुग्णालयातून बाहेर येऊन  चालते फिरते व्हायला  १५ दिवस  आरामात लागतील.  पवार हे या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला मोठा निर्णय करणार नाहीत. पवारांच्या आजारपणात भाजपही   पूर्वीसारखा आक्रमक नसेल.   गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा […]

Read More

शरद पवार ह्या वयात गद्दार होतील?

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी    भाजपचे चाणक्य  अमित शहा  यांची गुप्त भेट  घेतल्याच्या बातमीने  खळबळ आहे.  दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे ही भेट झाल्याची बातमी एका गुजराती  वृत्तपत्राने  दिली आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  अशी काही भेट झाल्याचा इन्कार केला.  पवारांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.  शहा मात्र बोलले. ‘राजकारणात सारं काही  सांगायचं नसतं’    असे शहा […]

Read More

पवारांना राष्ट्रपती व्हायचंय की युपीए अध्यक्ष?

                    राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार  यांना  कायम न्यूजमध्ये राहण्याची कला छान  साधली आहे.  तशी माणसे त्यांनी  ठेवली आहेत.   काहीतरी सनसनाटी  बोलून पवारांचे महात्म्य  वाढवण्याच्या खटपटीत ही माणसे असतात.  आता  आपले संजय राऊत  पहा. वाहिन्यांना बाईट दिल्याशिवाय  त्यांना करमत नाही.  शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना युपीएमध्ये नाही. पण वकिली पवारांची करतात.  पवारांनी युपीएचे म्हणजे संयुक्त पुरोगामी  आघाडीचे […]

Read More

उद्धव ठाकरेंच्या घरात घुसला करोना

करोनाने पुन्हा धुमाकूळ सुरु केला आहे.  खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असणाऱ्या काही व्यक्ती  पॉझिटीव्ह आल्याने  प्रशासन हादरले आहे.  काही दिवसांपूर्वी  उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांना करोनाची लागण झाली होती.  आता  उद्धव यांच्या पत्नी  रश्मी  ठाकरे  ह्याही पॉझिटीव्ह  निघाल्याने  चिंता वाढली आहे.  काही दिवसांपूर्वीच  रश्मी यांनी लस टोचून घेतली होती.  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ […]

Read More

उध्दवसाहेब, म्हातारी मरु द्या, पण गृहखात्याच्या बेशिस्तीचा काळ सोकवू देवू नका! -मधुकर भावे

महाराष्टÑातील महाआघाडी सरकारचा हा कसोटीचा काळ सुरु झालेला आहे. ‘शासना विरुध्द प्रशासन’ असा आरोप -प्रत्यारोपाचा हा खेळ महाराष्टÑाला कमीपणा आणणारा आहे. येणाºया १ मे रोजी महाराष्टÑ राज्याला ६१ वर्षे पूर्ण होतील. या ६१ वर्षांत ‘सरकार’ आणि ‘विरोधी पक्ष’ असे संघर्षांचे, ताण-तणावाचे, टोकाच्या विरोधाचे अनेक प्रसंग आले. पण समजूतदार राजकीय शहाणपणाने सरकार आणि विरोधी पक्ष त्या त्यावेळी […]

Read More