कोवीशिल्ड वॅक्शीन घेताने कोल्ड चेन मेनटेन आहे हे पाहिले का .?

Analysis News

नमस्कार मित्रांनो,
मी कुतूहल म्हणून सर्व डाॅक्टर मित्रांना विचारले कि कोवीशिल्ड वॅक्शीन घेताने कोल्ड चेन मेनटेन आहे हे पाहिले का .?बर्याचजणांना विचारले
तर डाॅ अभिजित अन्नदाते नी सांगितले ,

“नाही. मी एका समजुतदार, शहाण्या पेशंटसारखा स्टूलवर बसलो, बाही वर केली, लस टोचून घेतली आणि बाहेरच्या हाॅलमध्ये येवून अर्धा तास बसलो, रिअॅक्शन काही आली नाही, पॅरासिटॅमाॅलच्या गोळ्यांची पुडी घेतली, सिस्टरचे व गोळ्या देणार्यचे मनःपूर्वक आभार मानून घराचा रस्ता धरला. सिस्टरने काय टोचलं, ते कुठं ठेवलं होतं, कूठून काढलं काही पाहिलं नाही. कोल्डचेन मेन्टेन नसेल हा विचार डोक्यात आलाही नाही. “

अतीशय प्रातिनिधिक हे उत्तर आहे.

सर्वांनीही हेच केलं आणि त्यात वावगं काहीच नाही.

पण मी IMA, YEOLA BR.PRESIDENT ची जबाबदारी म्हणून दोन व्हॅक्शीन सेंटरला भेट दिली..तर खालील प्रकार आढळले

एका ठिकाणी व्हायल आईस क्यूबमध्ये होती पण आईस क्यूबमध्ये बर्फाऐवजी पाणी होते.

दुसर्या ठिकाणी चार वाजता पश्चिममेच्या खिडिकितून उन टेबलावरील व्हॅक्शीन व्हायल वर पडत ,व्हॅक्शीन गरम झालं होतं त्यातूनच टोचण्याचा कार्यक्रम चालू होता.
दोन्हीही ठिकाणी व्हॅक्शीन व्हायल पकडायला थंड केलेला फोरसेफ नव्हता अगदी मुठीत व्हायल घट्ट पकडून सिरिंजने व्हॅक्शीन काढून टोचलं जात होतं.

ही गोष्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना मनाला यातना देणारी आहे.

म्हणून मी ठरवलं IMA चा प्रतिनिधी म्हणून याबद्दल डाॅक्टरमध्ये जागरूकता अभियान चालू करावं म्हणून हा लेख………..

     सध्याच्या कोरोना लसीकरणात कोल्ड चेन मेनटेन न झाल्यास ही लशीकरण मोहीम वरदान ठरण्याऐवजी शाप ठरेल.

कारण….

1.कोव्हीशिल्ड हे व्हॅक्सीन प्राण रक्षक आहे...पण ते तितकेच नाजूकही आहे. 
 1. त्याचे तपमान (टेंप्रेचर) 2ते10 डीग्री सेंटीग्रेड राखलं गेलं(मेन्टेन झालं) तरच आणि तरच ते उपयोगी आहे.
 2. तपमान राखलं गेलं नाही तर व्हॅकशीनचे इंजेक्शन म्हणजे शुध्द पाण्याचे (डिस्टील्ड वाॅटरचे) इंजेक्शन घेतल्या सारखे होईल व त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि कोरोना पुन्हा होईल.
 3. व्हॅक्शीन कारखान्यात तयार झाल्यापासून तर थेट पेशंटला टोचण्यापर्यंतचा हा प्रवास खूप मोठा आहे व अनेक स्तरातून (स्टेजमधून) जाणारा आहे.अनेक व्यक्ती, वाहने, साठवणूक शीतयंत्र ( रेफ्रीजेटर्स), टोचणार्या व्यक्ती यांच्या हातातून जाणारा आहे.
 4. या सर्व प्रवासात त्याचे तपमान 2 ते 8 डिग्री राखणं म्हणजेच त्याची शीत साखळी (कोल्ड चेन)मेन्टेन करणे अत्यंत जटील आणि जबाबदारीचे काम आहे.
 5. आज मेडियावर चर्चा आहे कि काही लोकांना दोन्ही डोस घेऊनही पुन्हा करोना होत आहे. तर त्या लोकांना ही “कोल्ड चेन (शीत साखळी ) मेन्टेन झाली नसलेली ” लस टोचली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 6. कारण ही लस साठवण्यासाठी साधा फ्रीज चालत नाही. याचे कारण त्याचे टेम्प्रेचर (तपमान) सतत कमी जास्त होत राहाते. समजा हा साधा फ्रीज फार वेळ बंद राहीला म्हणजे उदा. जेव्हा रात्रभर बंद असतो तेव्हा तपमान हे 2 डिग्रीच्या खाली जाते बर्फ तयार होते आणि जर फ्रीज उघडला तर आतली थंड हवा जड असल्यामुळे झटकन खाली पायाकडे जाते याचा पायांवर एकदम थंड झोत येण्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे पण त्याच वेळेला लगेच वरची गरम हवा फ्रीजमध्ये घुसते. ही गरम हवा थंड होताने , तपमान एक डिग्री सेल्सियसने कमी होताने लॅटन्ट हीट 540 कॅलरीज रीलीज होते त्यामुळे सुरुवातीला फ्रीजची आतली हवा गरम होते व ताबडतोब तपमान 8 डिग्री च्या कितीतरी वर वाढून जाते. म्हणजेच व्हॅक्शीन ठेवण्यासाठी ह्या फ्रीज उपयोग चा नाही. तसेच ही लस चुकून जरी गोठली गेली तरीही देखील तिची क्षमता नष्ट होते. तर अशा लशीसाठी स्पेशल असा ILR(आईस लाईन्ड रेफ्रीजेटरच) पाहिजे असतो. त्याची रचना म्हणजे त्याच्या कडेला एकमेकांना चिकटून उभ्या बर्फ भरलेल्या नळ्या बसवलेल्या असतात.शिवाय तो आडवा असतो त्यामुळे उघडला तेव्हा त्यातील जड थंड त्यातच राहते व त्याचे तपमान स्थीर 2 ते 8 डिग्री च असते. हे आपणा सर्वांना माहीत आहे. “लशीचे बर्फ करायचे नाही तर ती बर्फाशेजारी ठेवायची आहे. “
 7. असे ILR सरकारी दवाखान्यात असतीलच पण लस टोचणार्या खाजगी हाॅस्पिटल मध्ये असे फ्रीज आहेत का याची खातरजमा करून घेणे जरूरीचे आहे. नसतील ती खाजगी लस केंद्रे तबडतोब बंद करावीत.
 8. या ILR पासून तर पेशंटला मिळेपर्यंतचा व्हॅक्शीन चा प्रवास व हाताळणी ही अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची असते.
 9. ILR मधून व्हॅक्शीन काढून ती व्हॅक्शीन सेंटरवर पोचवण्यासाठी ती “व्हॅक्शीन कॅरियर” या बाॅक्समध्ये टाकून न्यावी लागते. तर ह्या “व्हॅक्शीन कॅरियर ” मध्ये व्हॅक्शीन बाटल्या ज्याला मेडीकल भाषेत “व्हायल” म्हणतात त्या ठेवताने सरसकट एकदम ओंजळ भरून कांदे बटाटे घेतले आणि व्हॅक्शीन कॅरियर मध्ये टाकले असे करता येणार नाही कारण त्याचा शरीराशी संपर्क येईल व त्याचे तपमान आपल्या शरीराईतके म्हणजेच 37.5 डिग्री ला पोचेल आणि व्हॅक्शीन निरोपयोगी होईल.
 10. तर …ही प्रत्येक व्हायला एक एक करून आगोदरच थंड करून ठेवलेल्या चिमट्याने अलगद उचलून व्हॅक्शीन कॅरियर मध्ये ठेवायला पाहिजे.
 11. हा व्हॅक्शीन कॅरियर ज्यात एक तास अगोदरच आइस पॅक ठेवून थंड केलेला असावा. नाहीतर घेतला व्हॅक्शीन कॅरियर आणि भरले त्यात व्हॅक्शीन, तर या रूम टेम्रेचरला असलेल्या म्हणजे गरम , 28 -30 डिग्रीला असलेल्या हवेने या व्हॅक्शीन कॅरियर मध्ये व्हॅक्शीन व्हायलचे तपमान वाढून व्हॅक्शीन निकामी होऊ शकते.
  लस भरल्यावर व्हॅक्शीन कॅरियर टाईट बंद असावा.
 12. आता व्हॅक्शीन सेंटर वर हे व्हॅक्शीन कॅरियर नेताने सावलीत व जमल्यास ए सी गाडीतूनच न्यावेत. कुठल्याही परिस्थितीत गाडीतून नेताने त्यावर गाडीच्या खिडकीतून येणारे उन पडणार नाही याची काळजी घ्यावी.
 13. व्हॅक्शीन टोचण्यसाठी एक एक व्हायला बाहेर काढताने पूर्वीच थंड (प्री कूल्ड) केलेल्या चिमट्यानेच पकडून बाहेर काढावे.मुठीत पकडून नाही.
 14. बाहेर काढेलेले व्हॅक्शीन आइस पॅकमध्येच ठेवावे.
  त्या ऐवजी बर्याच ठिकाणी बाहेरच टेबलावर पडलेले व्हॅक्शीन व्हायल ( बाटली) दिसते , किंवा आइस पॅकमध्ये ठेवलेले तर दिसते पण आईस पॅकमध्ये आइसचे पाणी झाले तरी नवा आईस पॅक घेतला जात नाही, किंवा सध्या उन्हाळा सुरु झाला आहे, खिडकितून टेबलावर उन येत आहे. त्या टेबलावर हे व्हॅक्शीन व्हायल ठेवलेले दिसतात तर अशा व्हॅक्शीनचा काहीही उपयोग होणार नाही.
 15. शेवटची व महत्त्वाची स्टेप जिथे हमखास चूक होतेच ती म्हणजे व्हॅक्शीन बाटली सर्व बोटांनी किंवा मुठीत पकडायची नाही..कारण सरळ सरळ आहे तसं जर झालं तर व्हॅक्शीनचं तपमान शरीराइतके होऊन व्हॅक्शीन निकामी होइल. त्यासाठी बाटली अंगठा व अंगठ्याजवळचे बोट यानेच व ते ही बाटलीच्या तोंडाला जिथं आत रबरी बूच आहे (स्टाॅप रबर) आहे तिथं पकडून तिच्यातून हवं तेवढा डोस काढून झाल्यावर ताबडतोब आइसपॅक मध्येच ती बाटली ठेवावी. म्हणजे तपमान मेन्टेन राहील.

अशी ही प्रक्रिया आहे.तीचे सखोल ट्रेनिंग सर्व आरोग्य कर्मचार्याना दिलेले आहे.

पण कामाच्या रगाड्यामुळे प्रत्यक्ष लस देणार्या व्यकतीकडून त्याकडे दुर्लक्ष होते. आणि तसे झाले तर कोट्यवधी रूपये किमतीचे हे औषध वाया जाईल आणि हे प्रचंड श्रम वाया जातील.

असं होऊ नये म्हणून यावर लक्ष ठेवणारी फिरती पथकं तयार करावी.त्यांनी या व्हॅक्शीनेशनवर कडक नजर ठेवावी.

सरकारी लोक म्हणतात ह्या व्हॅक्शीनची क्षमता 70% च आहे. ते खरंच असेल .पण जरी ह्या लशीची क्षमता 70-80 टक्केच आहे म्हणजे 100 टक्के सरंक्षण ती देऊ शकत नाही पण काटेकोर कोल्ड चेन मेन्टेन केलेली लस टोचली गेली तर जे 70% सरंक्षण मिळेल, जीव तर वाचेल. मृत्यू होणार नाही.

पण कोल्डचेन मेन्टेन न केलेली लस टोचली गेली तर कुणालाही अजिबात कोरानापासून सरंक्षण मिळणार तर नाहीच ….

मात्र ….मात्र……

जनता लस घेतल्याच्या फसव्या भ्रमात राहील… मास्क वापरणार नाहीत…काळजी घेणे बंद करतील. आणि मग कोरोना केसेस अशाच भरमसाठ वेगाने वाढत राहतील.

मृत्यूचे हे तांडव असेच चालू राहील.

लसीकरणातून सरंक्षण मिळण्याऐवजी आपल्याला तो शाप ठरेल.
याची सद्सद्विवेक बुद्धी ने नोंद घ्यावी, काळजी घ्यावी.

डॉ. सुदाम पाटील…
प्रेसिडेंट, आय. एम्. ए. येवला

0 Comments

No Comment.