आपण विषारी भाज्या खातो

Analysis Food News

तुम्हाला कल्पना नसेल. पण   तुम्ही दररोज  भाज्यांसोबत थोडेय्होडे विषही खात असता.  आधीची पिढी रेशनचे धान्य खून  पोसली गेली. आताची पिढी   कीटकनाशके खाते आहे.  ‘आम्ही कधी डॉक्टर पहिला नाही’ असे सांगणारे  अनेक माणसे गेल्या पिढीत  सापडतील   आताची पिढीच्या  तर पहिल्याच वर्षात   दवाखान्याच्या चकरा सुरु होतात.  पेराल ते उगवेल. त्या प्रमाणे तुम्ही जे खाल  तसे  निघाल.  बालक हेन्ड्लिंग कार्पोरेशनच्या ताज्या अहवालाने खळबळ आहे.  

ह्या कार्पोरेशांची मुंबईत अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे.  निर्यात होणाऱ्या भाज्यांची आधी इथे चाचणी होते. आखाती देश तसेच युरोपात  भारतातून मोठ्या प्रमाणावर भाज्याची निर्यात होते.  तिकडच्या देशांना शुध्द भाज्या हव्या असतात. त्यामुळे  निर्यातीसाठी आलेल्या भाज्यांची  या प्रयोगशाळेत  चाचणी होते.   दररोज सरासरी २० नमुन्याची चाचणी होते.  साधारण १५ ते २० टक्के भाज्यांमध्ये  किताक्नाश्कांची मात्र   असल्याचा निष्कर्ष  ह्या कार्पोरेशनने काढला आहे.  किताक्नाश्के आढळतात ती भाजी  नाकारली जाते.  नाकारलेली भाजी  फेकली जात असेल  असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चक्त आहेत.  ही नाकारलेली भाजी  पुन्हा तुमच्याआमच्या खाण्यासाठी  बाजारात विकायला येते.  म्हणजे गंमत फ. आपले शेतकरी   भाज्या पिकवतात.   त्यातली शुध्द भाजी  परदेशात पाठवली जाते. आणि  कीटकनाशके असलेली भाजी    भारतात खपवली जाते.  खास म्हणजे आपलेच लोक हे काम करतात.  चांगली भाजी तिकडे आणि खराब भाजी इकडे.   

आरोग्याशी हा दुष्ट खेळ आहे. कुठल्या एक शहरात   हे सुरु आहे अशातला भाग नाही. देशभर हे सुरु आहे.  कोणालाही   हे थांबावे असे वाटत नाही.   रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या बेसुमार वापरामुळे शेती नासली आहे. पण कोणाचेही त्याकडे  लक्ष नाही.  उत्पादन  जास्त  घेण्याच्या धुंदीत आपण  थोडे थोडे विष  खाऊ घालतो आहेत.  गटाराच्या पाण्यावर भाज्यांचे पिक घेतले जात आहे. आपण हे पाहतो.  अडवत नाही. आगीशी  खेळणे आहे

भावी पिढी  बलवान हवी असेल तर  भाज्या, फळे, धन्ये विषमुक्त   मिळाली पाहिजेत.  पण ना सरकार गंभीर आहे ना  राजकारण्यांना निवडणुका जिंकण्याची धुंदी आहे. अलीकडे ओर्गानिक  भाजीचे प्रस्थ वाढले आहे. पण ही भाजी, ही फळे महाग असतात.  त्यामुळे  ८० टक्के भारतीयांच्या पोटात विषारी भाजीच जाते.

0 Comments

No Comment.