ते’ सत्यपाल सिंह.. आणि ‘हे’ परमवीर सिंह…. मधुकर भावे उत्तर-दक्षिण

Analysis News
Spread the love

महाराष्टÑाच्या पुरोगामी आणि स्वच्छ राजकारणाला कोणाची दृष्ट लागली आहे? महाराष्टÑाच्या गृहखात्याला काही प्रमाणात वाळवी लागली आहे का? एखाद्या सुंदर घरात छान कपाट असते. पण कपाटाच्या मागच्या बाजुला भिंतीकडून अनेकवेळा वाळवी लागते. महाराष्ट्राचे तसे काही झाले आहे का? आरोप-प्रत्यारोपाने जी धुळवड काही दिवस सुरु आहे. त्यामुळे महाराष्टÑाचे राजकारण काहीसे नासल्यासारखे झाले आहे. प्रशासनामध्ये धाक नावाची जी गोष्ट असावी लागते, ती काहीशी संपल्यात जमा आहे, त्यामुळे मुंबई पोलीस खात्याचे प्रमुख असलेले त्यापदावरुन बाजुला झाल्यावर त्यांच्याच गे्रेडच्या दुसºया पदावर बसून आरोप करु शकतात. निनावी पत्र पाठवून सरकार त्या पत्राची चौकशी करण्याची घोषणा करु शकते, असे सगळे, यापूर्वी कधीही न घडलेले, काहीतरी विपरीत असे, महाराष्टÑाला न मानवणारे एक विचित्र राजकारण महाराष्टÑात खेळले जात आहे. ज्या आक्षेपार्ह घटना आहेत त्याची चर्चा करायला कोणाची तयारी नाही. स्पष्टपणे बोलायची तयारी नाही. यात दोन महत्वाचे मुद्दे आहेत. त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. सार्वजनिक हिताकरीता ती चर्चा झाली पाहिजे. प्रशासनाच्या शिस्तीसंबंधात जे काही निकष आहेत. त्या संदर्भातही चर्चा झाली पाहिजे, आज तसे होताना दिसत नाही. आरोपांची राळ उडवली जाते आहे, चॅनेलवाल्यांना चोवीस तास दुकान चालवायचे असल्यामुळे असे मुद्दे त्यांना आठ-आठ दिवस चघळायला त्यांना चांगलेच असतात.

मुख्य विषय असा आहे की, मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांचे जे आरोप करणारे पत्र म्हणून सांगितले जात आहे, ते सुरुवातीचे पत्र निनावी होते. त्या निनावी पत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले, हेही विपरीत घडले. नंतर आयुक्तांच्या सहीचे पत्र आल्याचे सांगितले जाते. आयुक्तांचे आक्षेप त्यांची बदली केल्याबद्दल असतील तर प्रशासकीय शिस्तीच्या पध्दतीप्रमाणे ते दाद मागू शकतात. पण, बदली झालेल्या आयुक्तांनी ते ज्या पदावर होते, त्यावेळी त्यांना असलेली माहिती त्यांनी त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांना पोहोचवली नाही. पदावरुन दूर केल्यानंतर ती माहिती उघड केली जाते, त्याचे तोंडी उल्लेख केले जातात आणि त्या तोंडी उल्लेख्खावर चौकशा होतात. शासकीय सेवेत राहुन हे असे आरोप करता येतात. असे काही तरी नवीन या महाराष्टÑात घडत आहे. शिवाय, आता संबंधित पोलीस आयुक्त न्यायालयात गेले आहेत. महाराष्टÑाचे आणि देशाचे न्यायमंदिर योग्य तो निर्णय करेलच. पण एक शंका मनात येते. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा माजी पोलीस आयुक्त पोहोचले तेव्हा त्यांचे वकील श्री. रोहतगी होते. हे एवढे मोठे नावाजलेले वकील आहेत की, त्यांच्या एक दिवसाच्या

३० लाख रुपये ‘फी’ ची बाहेर चर्चा आहे, ती ऐकल्यानंतर एका माजी पोलीस आयुक्ताला एवढा मोठा वकील कसा परवडतो? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आला तर तो अगदी वास्तव प्रश्न आहे. हे सगळेच प्रकरण तोंडी आरोपांवर आधारीत आहे, असे आरोप कोेणी कोणावरही करु शकेल. अनिल देशमुख आज जात्यात असतील, याच न्यायाने अनेकजण सुपात असू शकतील. ज्यावेळी निनावी पत्राच्या चौकशीची घोषणा झाली त्याच घोषणेपासून चुकीची पावले उचलली गेली आणि त्यामुळे महाराष्टÑाच्या चारित्र्याची चर्चा सुरु झाली. ही चारित्र्याची चर्चा पदावरुन दूर झाल्यावर आरोप करणाºयांमुळे झालेली आहे. आता या प्रकरणाचा शेवट कुठे होईल आणि कसा होईल हे सांगण अवघड आहे पण, गेली ३०-३५ वर्ष महाराष्टÑाच्या राजकारणात खानदानी पध्दतीने वावरणाºया अनिल देशमुख यांना सध्या घेरलं गेलं आहे आणि ते एका सनदी अधिकाºयांना घेरलं आहे, त्यांनी केलेले आरोप सिध्द व्हायचे आहेत आणि गंमत अशी आहे की, अनिल देशमुखांना आरोप सिध्द होण्यापूर्वीच आरोपीच्या पिंजºयात उभं केलं आहे. माजी पोलीस आयुक्त त्या पदावर होते तेव्हा त्यांनी आरोप केले असते तर, समजू शकले असते. पदावरुन दूर केल्यावर आरोप केल्यामुळे त्यांच्या आरोपांमधला कच्चेपणा कोणताही वकील अतिशय प्रभावीपणे मांडू शकेल. शिवाय एका फौजदाराकडे राज्याचा गृहमंत्री अशी देवाण-घेवाणीची चर्चा करेल, हे सगळेच प्रकरण त्यामुळे सरळ वाटत नाही.

राजकारण किती मजेशीर असते बघा. आणि राजकारणात वावरणारी सर्व पक्षाची माणसं जशी हुशारीने वागत असतात… अनिल देशमुख माझे फार जुने मित्र आहेत. जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते तेव्हापासून त्यांना मी पाहतो आहे, त्यांचे काम पाहतो आहे. ३०-३५ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात अनेक पदांवर त्यांनी काम केले. तेव्हा त्यांच्याकडे कोणी बोट दाखवले नव्हते. नागपूर ‘लोकमत’ला संपादक असताना ते नागपूरातच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. तेव्हापासून हा नेता मी पाहतो आहे. त्यांचे खानदानीपण अनुभवले आहे, त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे केल्यावर मुद्दाम ३० मार्च रोजी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो. जेव्हा माणसं घेरली जातात, त्याचवेळी मित्राने मित्राला भेटायचं असते. त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो तेव्हा बंगल्यावर सन्नाटा होता. ऐरव्ही बाहेर गाड्यांची रीघ, बसायला जागा नसायची, अशा तुडुंब गर्दीत बंगला फुललेला असायचा. ६० वर्षे महाराष्टÑाचे राजकारण पाहतो आहे. राजकीय माणसं कशी लबाड असतात, हेही अनुभवतोय. अनिल देशमुख आज गृहमंत्री आहेत. पण कार्यकर्त्यांना असे वाटते आहे की, उगाच कशाला जा?… राजकीय कार्यकर्तेही हिशोबाने वागतात. मोकळ्या मनाने वागत नाहीत, त्याचा प्रत्यय अशावेळी येतो. घर असो किंवा राजकारण… अडचणी सगळ्यांना येतात. ठामपणे त्याचा मुकाबला करायचा असतो, अनिलबाबू तो करतील आणि त्यांचे निर्र्दोषत्वही सिध्दही करतील आणि त्यांचे निर्दोषत्व सिध्द झाले की, मग हार-तुरे घेऊन शाल पांघरायला, आज सन्नाटा असलेल्या बंगल्यावर कशी गर्दी उसळते बघा…
राजकारण असं असतं…
एक विचार मनात आला. त्या घटनेला जवळपास ७ वर्षे झाली. त्यावेळचे मुंबईचे पोलीस आयुक्त होते

श्री.सत्यपाल सिंह. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर या पोलीस आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते भाजपामध्ये दाखल झाले, त्यावेळी राज्याचे मुख््यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण होते. सत्यपाल सिंह यांचा राजीनामा येईपर्यंत त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना ‘मुंबईचे पोलीस आयुक्त’ राजीनामा देणार आहेत, भाजपामध्ये जाणार आहेत, लोकसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत, नंतर त्यांना मंत्री व्हायच आहे’ यापैकी एकाही गोष्टीचा मुख्यमंत्र्यांना पत्ता नव्हता. सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिला. उत्तरप्रदेशातील बागपत लोकसभा मतदारसंघातून चरणसिंग यांचे पुत्र अजित सिंग यांच्याविरुध्द उभे राहून ते निवडुन आले आणि २०१४ साली मोदींच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले.
आताचे परमवीर सिंह महाराज यांना पदावरुन दूर केल्यावर ते असे काही आरोप करतील.. सरकारलाच आरोपीच्या पिंजºयात उभे करतील आणि तसे उभे करत असताना सरकारच्या गृहखात्याच्याच नोकरीत राहून ते हे सगळं घडवून आणतील… महाराष्टÑाचे राजकारण किती गढूळ झालं आहे, त्याचा प्रत्यय गेले काही महिने येत आहे.

श्री. सत्यपालसिंह तसा राजीनामा देऊन गेले. श्री.परमवीर सिंह यांना पदावरुन दूर केल्यावर त्यांनी आरोपाची धुळवड करुन ते सरकारच्याच नोकरीत बसले आहेत….

अशा महाराष्टÑाची १ मे रोजी ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. आपण सर्व आताच्या महाराष्टÑातील या गढूळ राजकारणाची कल्पना तरी करु शकतो का?…

लोकांचे प्रश्न जिथे आहेत, तिथेच पडून आहेत. कोरोनाचा अक्राळ-विक्राळ विळखा अधिक भयानक आहे. हातावर पोट असणाºयांची परिस्थिती बिकट होण्याची भीती आहे. या सगळ्या स्थितीत महाराष्टÑातील सर्व चॅनेल आणि वृत्तपत्रे आरोप-प्रत्यारोपाची धुळवड साजरी करीत आहेत. ६० वर्षापूर्वीचा महाराष्टÑ आज कुठे चालला आहे.? सध्या महाराष्टÑाच्या सरकारात ‘वाघ’ बसले आहेत. त्या वाघांना एका ‘सिंहा’ची भीती कधीपासून वाटायला लागली?

 302 Total Likes and Views

0 Comments

No Comment.