मराठी भाषेसाठी राज्याच्या या अर्थसंकल्पात काही तरतूद आहे काय?

     ‘मराठी भाषेसाठी राज्याच्या या अर्थसंकल्पात काही तरतूद आहे काय? कोणाला कळले तर सांगा’  असा संदेश श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा संदेश वाचला आणि मलाच माझी लाज वाटली. खरेच आपण कुठल्या महाराष्ट्रात राहत आहोत?  आपले राज्यकर्ते कुठल्या मानसिकतेचे आहेत? ‘ मंत्रालयाच्या दारात  राजमुकुट घालून परंतु अंगावर लक्तरे लेवून  मराठी उभी आहे’ अशी खंत  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ३० […]

Read More

आत्महत्यांभोवती फिरणे महाराष्ट्राला परवडेल?

दोन महिन्यांपासून आत्महत्या  हा विषय राज्यात गाजतो आहे.  तसे पाहिले तर दररोज  डझनाने आत्महत्या होतात. पण वेगवेगळ्या कारणाने  झालेल्या ह्या तीन आत्महत्या उद्धव सरकारच्या पाठीशी  जणू  हात धुवून लागल्या आहेत.  महाराष्ट्राचे राजकारण ह्या आत्महत्याभोवती फिरते आहे.  मृत व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हा हट्ट समजू शकतो. पण त्यासाठी   सरकारला कोंडीत  पकडणे  राज्याला परवडणारे नाही.  राज्यापुढे करोना, […]

Read More

‘बने बने, पहा, मंत्रालयाचे अजून सचिवालयच आहे ग! ’ – मधुकर भावे

साधारणपणे ५० वर्षे झाली असतील. ‘महाराष्टÑ टाइम्स’चे त्यावेळचे बुध्दिमान संपादक श्री गोविंदराव तळवलकर यांनी, कधी नव्हे तो, एक खुसखुशीत आणि प्रहसनात्मक सुंदर अग्रलेख लिहीला होता. त्या अग्रलेखाच नाव होतं ….‘बने बने, पहा हे सचिवालय’… त्यावेळी सचिवालयाचे ‘मंत्रालय’ झालेले नव्हते. अर्थात ‘सचिवालय’ किंवा ‘मंत्रालय’ या शब्दाच्या फरकाने गेल्या ५० वर्षांतील कामकाजात फार मोठा गुणात्मक फरक झाला […]

Read More

लस घेतली का लस?

महाराष्ट्रात करोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे.  नागपुरात तर दररोज हजाराच्या घरात  करोनाबाधितांचा आकडा   येत आहे.  सरकारने निर्बंध वाढवले असतानाही   लोक फारसे गंभीर दिसून येत नाहीत.  शनिवार-रविवारी बाजारपेठ आणि दुकाने बंद असतानाही    रस्त्यांवर लोकांची गर्दी  दिसली. काही जणांनी तर मास्क देखील लावले नव्हते.  कुठलेही महत्वाचे काम नसताना  लोक बाहेर पडत असल्यामुळे    करोना नियमांचा  फज्जा उडतो आहे.  […]

Read More

‘जनतापर महंगाई की मार, ‘महंगी’ पडी मोदी सरकार…’ मधुकर भावे

खूप दिवसांनी कॉंग्रेसमधील ‘चिंतन समूह’ जागा झालेला दिसतो आहे. गेल्या सहा वर्षांत भाजपाच्या ‘थिंक टँक’ने विचारपूर्वक अविचारी प्रचार किती प्रभावी होऊ शकतो, सामान्य माणसाला कस फसवलं जाऊ शकतं. याचे अनेक प्रयोग करुन दाखवले. महागाई वाढल्याच्या नावावर, देशातल्या काळ्या पैशाच्या नावावर, भ्रष्टाचाराच्या नावावर…. या सगळ्या प्रचार-अपप्रचारात भाजपाच्या या चिंतन ग्रुपमागे काही बुध्दिवादी लोक होते. भ्रम पैदा […]

Read More

मुनगंटीवार, फडणवीस, मंडळं काय मागता? विदर्भ राज्य मागा

महाआघाडी सरकार आणि  राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांच्यातल्या लढाईने आज  भयंकर वळण घेतले.  विधानपरिषदेवर नेमायच्या १२  आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांनी अडवून ठेवली आहे.  त्यामुळे महाआघाडीत अस्वस्थता आहे.  राज्यपालांनी  आमदारांची यादी अडवली म्हणून   वैधानिक  विकास मंडळांची पुनर्स्थापना अडवायची असा निर्णय  सरकारने घेतला आहे.  ही लढाई आज विधानसभेच्या आखाड्यात आली तेव्हा राजकारण उकळू लागले. पुढच्या निवडणुका २०२४ […]

Read More

अमिताभ बच्चन आजारी, शस्त्रक्रिया होणार

सुपरस्टार ७८ वर्षे वयाचे अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली आहे.  त्यांच्यावर  लवकरच एक मोठे ऑपरेशन करावे लागणार आहे.  खुद्द अमिताभ यांनीच  आपल्या ब्लॉगमध्ये  शनिवारी रात्री ही माहिती दिली.  यापेक्षा जास्त आपण लिहू शकत नाही असेही ते म्हणाले आहेत.   अमिताभ यांनी एकच ओळ  लिहिली आहे. पण ह्या ओळीने   साऱ्यांना हादरवून टाकले.  अनेकांच्या डोळ्यात  पाणी आले. घरचाच […]

Read More

मुकेश अंबानींच्या जीवावर कोण उठलं असेल?

प्रसिध्द उद्योगपती आणि रिलायन्स  समुहाचे  सुप्रीमो   ६३ वर्षे वयाचे मुकेश अंबानी यांच्या जीवावर कोण उठलं असावं?  काल  रात्री मुंबईतील  त्यांच्या  बहुमजली घराजवळ रस्त्यालगत   स्फोटकांनी भरलेली   स्कोर्पियो कार  सापडल्याने  खळबळ आहे.  कारमध्ये एक पिशवी सापडली.  तिच्यातल्या पत्रात ‘ये तो ट्रेलर है’  अशा शब्दात  अंबानी यांना धमकी आहे. कारमध्ये   जिलेटीनच्या २१  कांड्या  सापडल्या.   खाणकामासाठी   स्फोट घडवण्याकरिता असल्या […]

Read More

हमाम मे सब नंगे

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय अधिकारी, स्पष्टवक्ते म्हणून प्रसिध्द आहेत.  महाराष्ट्र पोलिसांमध्ये जे ५-२५ निष्ठावान अधिकारी आहेत त्यामध्ये नगराळे हे एक आहेत.  गुरुवारी त्यांनी नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.  त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक धक्कादायक विधान केले. नगराळे म्हणाले, ‘भ्रष्टाचार हा  केवळ पोलीस, वन व महसूल विभागातच आहे असे नाही.   […]

Read More

‘मी मास्क घालतच नाही’ असे राज ठाकरे कसे बोलू शकतात?

मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे  वेगळे रसायन आहे.  त्यांच्या सभा, त्यांची वक्तव्ये एकदम हटके  असतात.  त्यामुळेच कुठल्याही  पुढाऱ्याच्या  सभांना  होत नाही तसली गर्दी त्यांना ऐकायला होते.   आज त्यांनी ‘मी मास्क घालतच नाही.  तुम्हालाही सांगतो’  असे पत्रकारांना सांगून  नव्या  चर्चेला तोंड फोडले.                      करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना   काळजी घेण्याचे आवाहन  प्रशासन  वारंवार करीत आहे.  मास्क घालायला […]

Read More