‘नागपूरचे वाजपेयी’ दयाशंकर तिवारी नवे महापौर

Maharashtra Nagpur News
Spread the love
भाजपची मुलुख मैदान तोफ आणि तडफदार वक्तृत्वासाठी प्रसिद्ध  भाजप नेते दयाशंकर वाजपेयी नागपूरचे ५४ वे महापौर बनले आहेत. आज मंगळवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी कॉन्ग्रेसचे उमेदवार रमेश पुणेकर यांचा दणदणीत पराभव केला. दयाशंकर यांना १०७ तर  पुणेकर यांना अवघी २७ मते पडली. दयाशंकर यांच्या विजयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या प्रभाग १९ मध्ये तर जल्लोष आहे. तास तास बोलत राहून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद नव्या महापौरात आहे. करोनाकाळात महापालिकेच्या तिजोरीत ठणठ्नाट असताना दयाशंकर विकासाची कामे कशी मार्गी लावतात याकडे शहराचे लक्ष लागणार आहे. 

नागपूरचे महापौरपद भाजपने दोघांना १३-१३ महिन्याचे वाटून दिल्याने ही निवडणूक घ्यावी लागली. मावळते महापौर संदीप जोशी यांचे १३ महिने संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली. गेली १० वर्षे नागपूर महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे दयाशंकर विजयी होणार हे पक्के होते. तरीही ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आल्याने उत्सुकता होती. सारे नगरसेवक मोबाईल घेऊन बसले होते. पाच नगरसेवकांना मात्र लिंक मिळू शकली नाही. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी निकाल जाहीर केला. 

 कॉंग्रेसच्या दोन गटांनी वेगवेगळे उमेदवारी अर्ज भरल्याने बंडखोरी होते की काय अशी भीती होती. मात्र  आज मनोज गावंडे यांनी माघार घेतल्याने कॉन्ग्रेसचा पेच टळला. 

Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)

 210 Total Likes and Views

0 Comments

No Comment.