एकही दादा, अजितदादा !

Analysis Maharashtra Others Politics

बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजितदादा पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने म्हणजे एसीबीने क्लीन चिट दिली आहे. तीन दिवसांच्या सरकारच्या राजीनाम्यानंतर एसीबीच्या नागपूरच्या अधिकाऱ्याने अजितदादांना क्लीन चिट दिली होती. आता एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी मोठा दिलासा दिला. सरकार वाकते. वाकवणारा पाहिजे, असे काही आहे का? महाविकास आघाडीच्या राज्यात क्लीन चिट स्वस्त झाल्या आहेत असे दिसते. पण अजितदादांना क्लीन चिट देणारे हे कोण?

सिंचन घोटाळ्याचे प्रकरण नागपूर उच्च न्यायालयात सुरू आहे. ह्या घोटाळ्याची ईडी किंवा सीबीआयतर्फे चौकशी करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी चालू आहे. क्लीन चिट द्यायची झाली तर न्यायालय देईल. मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या आठवड्यात होतो आहे. त्याची ही तयारी दिसते. दादांना मानले पाहिजे. सरकारमध्ये नसूनही त्यांची ‘दादागिरी’ अगम्य आहे. काकाला वेळोवेळी अडचणीत आणल्यानंतरही राष्ट्रवादीतील त्यांची ठाकूरकी कायम आहे. घोटाळ्याची टांगती तलवार गेल्याने आता दादांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या मार्गातील अडचण दूर झाली आहे.

Moreshwar Badge :- Editor-in-chief of Hi Maharashtra
(Journalist by profession, senior political analyst and critique, served as a resident editor Lokmat.)

0 Comments

No Comment.