‘मी मास्क घालतच नाही’ असे राज ठाकरे कसे बोलू शकतात?

मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे  वेगळे रसायन आहे.  त्यांच्या सभा, त्यांची वक्तव्ये एकदम हटके  असतात.  त्यामुळेच कुठल्याही  पुढाऱ्याच्या  सभांना  होत नाही तसली गर्दी त्यांना ऐकायला होते.   आज त्यांनी ‘मी मास्क घालतच नाही.  तुम्हालाही सांगतो’  असे पत्रकारांना सांगून  नव्या  चर्चेला तोंड फोडले.                      करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना   काळजी घेण्याचे आवाहन  प्रशासन  वारंवार करीत आहे.  मास्क घालायला […]

Read More

पोहरादेवीत करोना

विदर्भात  करोनाचे रुग्ण वाढत आहेत.    अमरावती, वाशीम, नागपूर  जिल्ह्यांमध्ये मोठा त्रास आहे. अशा वेळी एक धक्कादायक बातमी आली आहे. वाशीम जिल्ह्यातील  पोहरादेवी गडावर   खुद्द महंत  कबीरदास महाराज  यांच्यासह    त्यांच्या कुटुंबातील  तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.  इथे एकूण १९ जण पॉजिटीव्ह निघाले आहेत.              २३ फेब्रुवारी रोजी  वनमंत्री संजय राठोड गडावर आले […]

Read More

पाकिस्तानात पेट्रोल ५१ रु., नागपुरात ९७ रु.

आपल्या   देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती आकाशाला  भिडत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने  आपल्याकडे  पेट्रोल-डिझेल महाग आहे.   आणि ते आणखी महाग होऊ शकते. जगातील तेल उत्पादक देशांनी  फेब्रुवारी अखेरपर्यंत  कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यात येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.  त्यामुळे करोनाकाळातही मागणीच्या तुलनेत  पुरवठा कमी असल्याने भाव भडकले आहेत.                   आज नागपुरात पेट्रोल ९७ रुपये […]

Read More

राठोड यांचा मुंडे झाला?

            कुणी कितीही पटका,  वनमंत्री आणि शिवसेना नेते  संजय राठोड यांचा बाल बाका होणार नाही.  करोनाच्या भाषेत बोलायचे झाले तर राठोड  ‘निगेटिव्ह’ आहेत, ‘निगेटिव्ह’ राहतील.  राठोड यांना आज सरकार दरबारी जी   वागणूक मिळाली त्यावरून हे स्पष्ट झाले.  मराठवाड्यातील पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या आत्महत्येच्या  वादात अडकलेले   राठोड  १५ दिवस गायब होते.  काल  अचानक ते पोहरादेवी गडावर […]

Read More

मुख्यमंत्र्यांवर भारी पडताहेत संजय राठोड?

पूजा चव्हाण ह्या मराठवाड्यातील परळीच्या अवघ्या २२ वर्षे वयाच्या तरुणीच्या आत्महत्येमुळे वादात अडकलेले   राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड  तब्बल १५ दिवसानंतर  बंजारा समाजाची काशी  पोहरादेवी मंदिरात  प्रगटले. पूजाच्या आत्महत्येत भाजपने  राठोड यांचे नाव घेतल्याने ते काय बोलतात याकडे  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. राठोड यांनी मी त्यातला नव्हे असे सांगून सारे आरोप झटकून टाकले. […]

Read More

म्हणून वाढला करोना, शरद पवार सोबत असूनही भुजबळांची विकेट

करोना मेला नव्हता, तो जाणारही  नाही.   पुढचे संपूर्ण आयुष्य आपल्याला करोनासोबतच जगायचे आहे. दोन महिन्यापूर्वी  सरकारलाही वाटले. करोना गेला.  हळू हळू   सारे अनलॉक व्हायला लागले. एखादे धरण फुटावे   तसे लोकांचे झाले. आठ-नऊ महिन्याचे भयंकर अनुभव लोक विसरले, बेशिस्त फिरू लागले. आता हाच मोकळेपणा तापदायक ठरतो आहे.  दररोज रुग्णसंख्या भरमसाट वाढते आहे.  गेल्या १० दिवसात महाराष्ट्रात   […]

Read More

‘मीच जबाबदार’, मग सरकार किती जबाबदार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी  जनतेशी  मोकळा संवाद  साधला. ते बोलणार म्हणजे पुन्हा लॉकडाऊन  लागणार  ह्या चिंतेने लोक दहशतीत होते. मुख्यमंत्र्यांनी तसे काही केले नाही.  आठ दिवसाचा अल्टीमेटम मात्र दिला. म्हणजे आठ दिवसात करोना कमी झाला नाही तर लॉकडाऊन येऊ शकतो. ठाकरेंनी सबुरी दाखवली. मात्र अमरावतीमध्ये मात्र तिथल्या त्यांच्या पालकमंत्र्याने  उद्या सायंकाळपासून एक आठवड्यासाठी लॉकडाऊन  […]

Read More

नाना पटोलेंची फजिती, अमिताभच्या ‘झुंड’ सिनेमापुढे आता फक्त काळे झेंडे

              ‘अमिताभ बच्चनचे चित्रपट बंद पाडू’  अशी आक्रमक घोषणा करणारे   प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष  नाना पटोले यांना  हायकमांडने चांगलाच ब्रेक मारला.  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  बाबतीत कॉन्ग्रेस  हस्तक्षेप करणार नाही असे कॉन्ग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख  रणदीपसिंह  सुरजेवाला यांनी  दिल्लीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे नानाभाऊंना  एक पाऊल  मागे हटावे लागले.  अमिताभचा बहुप्रतीक्षित ‘झुंड’ चित्रपट येत्या  १८ जून रोजी  थिएटरमध्ये […]

Read More

अधिवेशनावर करोनाचे सावट

वाढत्या करोनाचा फटका  राज्य विधीमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय  अधिवेशनाला बसण्याची शक्यता आहे. येत्या १ मार्चपासून  मुंबईत सुरु होणाऱ्या या अधिवेशनाचे  ८ मार्चपर्यंतचे   कामकाज निश्चित झाले आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडायचा आहे. २५ फेब्रुवारी रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. तिच्यात अधिवेशन पुढे चालवायचे की गुंडाळायचे याचा  निर्णय होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन साधारण पाच ते सहा आठवड्याचे […]

Read More

आयपीएलला पैशाची कडकी नाही

क्रिकेटच्या नावानं काही लोक  शिव्या घालत असली तरी तुम्ही लिहून ठेवा. क्रिकेट कधीच बंद होणार नाही.  आणि समजा उद्या क्रिकेट बंद झाले तरी इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे  आयपीएल बंद होणार नाही.  कारण  क्रिकेटमध्ये पैसा आहे, ग्लामर आहे. करोनामुळे  सारे जग कोसळू पाहत असताना   आयपीएलला पैशाचा प्रॉब्लेम येणार  असे तुम्हाला वाटत असेल तर  तसे काही झालेले […]

Read More