‘बने बने, पहा, मंत्रालयाचे अजून सचिवालयच आहे ग! ’ – मधुकर भावे

साधारणपणे ५० वर्षे झाली असतील. ‘महाराष्टÑ टाइम्स’चे त्यावेळचे बुध्दिमान संपादक श्री गोविंदराव तळवलकर यांनी, कधी नव्हे तो, एक खुसखुशीत आणि प्रहसनात्मक सुंदर अग्रलेख लिहीला होता. त्या अग्रलेखाच नाव होतं ….‘बने बने, पहा हे सचिवालय’… त्यावेळी सचिवालयाचे ‘मंत्रालय’ झालेले नव्हते. अर्थात ‘सचिवालय’ किंवा ‘मंत्रालय’ या शब्दाच्या फरकाने गेल्या ५० वर्षांतील कामकाजात फार मोठा गुणात्मक फरक झाला […]

Read More

उद्धव नाणार देणार?

        आपल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना  कधी कुठला झटका येईल ते सांगता येत नाही.  भाजप असो की शिवसेना,   दोघांच्याही घोषणा चमकोगिरीच्या  असतात.  कोणीही कुठल्या भूमिकेवर ठाम नसतो.  सरडाही लाजेल, तशा गरजेनुसार भूमिका बदलत असतात.  एकेकाळी   बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे  गोपीनाथ  मुंडे यांनी एनरॉन म्हणजेच दाभोळ प्रकल्प    समुद्रात बुडवून टाकण्याची घोषणा केली होती. पुढे युतीची सत्ता आली […]

Read More

मोदी खेळताहेत ममतांशी जुगार

कोलकात्याच्या ब्रिगेड  मैदानावर काही लाखांची सभा घेऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज  पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.  तिकडे सिलीगुडीमध्ये  महिलांची रिकाम्या सिलेंडरसह  पदयात्रा  काढून   मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो  ममता बनेर्जी  यांनीही  शंखनाद  केला. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अजून २० दिवस असले तरी युद्ध पेटले आहे.  दोघांसाठीही ही आरपारची लढाई आहे. दीदीने ही निवडणूक जिंकली तर ती […]

Read More

लस घेतली का लस?

महाराष्ट्रात करोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे.  नागपुरात तर दररोज हजाराच्या घरात  करोनाबाधितांचा आकडा   येत आहे.  सरकारने निर्बंध वाढवले असतानाही   लोक फारसे गंभीर दिसून येत नाहीत.  शनिवार-रविवारी बाजारपेठ आणि दुकाने बंद असतानाही    रस्त्यांवर लोकांची गर्दी  दिसली. काही जणांनी तर मास्क देखील लावले नव्हते.  कुठलेही महत्वाचे काम नसताना  लोक बाहेर पडत असल्यामुळे    करोना नियमांचा  फज्जा उडतो आहे.  […]

Read More

मनसुख बुडाला की त्याला बुडवले?

आपल्याकडे माणसं  मरतात, मारली जातात, काही आत्महत्या करतात,   सेलिब्रिटी असेल तर  चर्चा होते.  पोलीस तपासात  किती जणांना मरणोत्तर न्याय मिळतो? हा प्रश्नच आहे.  अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मुंबईतला संशयास्पद मृत्यू  थेट  बिहारमध्ये गाजला. राजपूतला ड्रग पुरवण्याच्या  आरोपात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती  अडकली.  पूजा चव्हाण ह्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यामुळे   शिवसेनेच्या एका मंत्र्याला घरी बसावे लागले.  […]

Read More

राज ठाकरे मास्क घालत नाहीत हे प्रशासनाला चालते का?

करोनासंबंधीचे नियम  अतिशय   कडक आहेत. प्रत्येकाने   तोंडाला मास्क लावला पाहिजे, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे  असे हे नियम सांगतात. अनेक लोक हे नियम पाळत  आहेत. ज्येष्ठ साहित्यिक  श्रीपाद भालचंद्र जोशी गेल्या एक वर्षापासून  जिन्याखाली उतरलेले नाहीत. असे अनेक आहेत. पण  आपण रस्त्यावर अनेक जण मास्क नसलेले पाहतो.  प्रशासन त्यांना दंडही ठोठावत आहे. पण मनसेचे  सुप्रीमो राज […]

Read More

श्री गजानन महाराज प्रगट दिन

माघ वद्य ७ शके १८००(२३ फेब्रुवारी १८७८)या दिवशी १८वर्षाचे गजानन महाराज शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेमध्ये लोकांची दृष्टी असे मानले जाते. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठा बाहेर  उष्ट्या पत्रावळी तील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे “कोणा हा कोटींचा काहीच कळेना ब्रह्माच  ठिकाण कोण सागे। साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती। […]

Read More

संघ तेव्हा कुठे होता?

राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तरात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  भाजपवर बोलताना  ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही घसरले.  तसे पाहिले तर  संघाचा विषय काढायची गरज नव्हती. पण काढला. संघाला झोडपणे सर्वांना  आवडते. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघ नव्हता’ असे ठाकरे म्हणाले. त्यावरून राजकारण तापले आहे.  संघाचे संस्थापक सरसंघचालक    केशव बळीराम हेडगेवार हे  स्वतः   एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित […]

Read More

‘जनतापर महंगाई की मार, ‘महंगी’ पडी मोदी सरकार…’ मधुकर भावे

खूप दिवसांनी कॉंग्रेसमधील ‘चिंतन समूह’ जागा झालेला दिसतो आहे. गेल्या सहा वर्षांत भाजपाच्या ‘थिंक टँक’ने विचारपूर्वक अविचारी प्रचार किती प्रभावी होऊ शकतो, सामान्य माणसाला कस फसवलं जाऊ शकतं. याचे अनेक प्रयोग करुन दाखवले. महागाई वाढल्याच्या नावावर, देशातल्या काळ्या पैशाच्या नावावर, भ्रष्टाचाराच्या नावावर…. या सगळ्या प्रचार-अपप्रचारात भाजपाच्या या चिंतन ग्रुपमागे काही बुध्दिवादी लोक होते. भ्रम पैदा […]

Read More

गुलाम नबी बंड करणार? कॉन्ग्रेस फुटणार?

जहाज बुडायला आले ते उंदरांना आधी कळते असे म्हणतात. ते बाहेर उड्या मारतात. तसे कॉन्ग्रेसचे झाले आहे.  कालपर्यंत   कॉन्ग्रेसने पोसलेले  ज्येष्ठ नेते  डोळे वटारत आहेत. गुलाम नबी ७१ वर्षांचे आहेत, आनंद शर्मा ६८ वर्षांचे आहेत.  घाटावर जायच्या वयात ह्या नेत्यांना कॉन्ग्रेसचे कसे होणार? याची चिंता पडली आहे.  दोन वर्षे होत आहेत. कॉन्ग्रेसला फुल टाइम  अध्यक्ष […]

Read More