पवारांच्या पोटदुखीने सरकारवरचे संकट लांबले

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या अचानक उमललेल्या पोटदुखीने  महाआघाडी सरकारवरचे संकट  लांबले.    बुधवारी त्यांच्या पित्ताशयावर  शस्त्रक्रिया आहे.  रुग्णालयातून बाहेर येऊन  चालते फिरते व्हायला  १५ दिवस  आरामात लागतील.  पवार हे या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला मोठा निर्णय करणार नाहीत. पवारांच्या आजारपणात भाजपही   पूर्वीसारखा आक्रमक नसेल.   गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा […]

Read More

पूजा ते दीपाली…आणखी किती निर्भया?

अमरावती जिल्ह्यातल्या  मेळघाटातल्या   वनपरिक्षेत्र अधिकारी  दीपाली चव्हाण  यांनी  बंदुकीची गोळी घालून केलेल्या आत्महत्येने  वन विभागच नव्हे तर  सारे राज्य हादरले आहे. ३५ वर्षे वयाच्या ह्या महिला अधिकाऱ्याने  आत्महत्येपूर्वी एक पत्र लिहून ठेवले.   वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून  आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले.   दोन अधिकाऱ्यांची नावेही लिहिली. त्यातल्या एकाला  निलंबित करून अटक  झाली तर दुसऱ्याची  बदली करण्यात आली. […]

Read More

‘कुणी बेड देता का बेड’

‘नटसम्राट’ नाटकात   श्रीराम    लागू  ‘कुणी घर देता का घर’   असा टाहो फोडतात  तेव्हा  काळीज फाटते.  करोना महामारीच्या   पार्श्वभूमीवर  राज्यात सध्या तेच चित्र आहे.  नागपूर आणि औरंगाबाद  येथे तर  आरोग्य  यंत्रणाच  व्हेंटीलेटरवर आहे.  ‘कुणी बेड देता का बेड’  म्हणत  करोनाबाधितांचे नातलग   रुग्णालये पालथी घालत आहेत. पण सरकारी  रुग्णालयात बेड मिळत नाही. खासगी  रुग्णालयात  जायचे झाले तर […]

Read More

उद्धव सरकारचा गेम होणार?

सरकार बनवायला आमदारांचे बहुमत लागते. पण सरकार चालवायला अधिकाऱ्यांचे  बहुमत लागते. महाराष्ट्रात सध्या हेच पाहायला मिळते आहे.  अधिकाऱ्यांकडून मिळवलेली माहिती घेऊन  विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  फटाके फोडत आहेत. आमदार फोडता येत नाहीत म्हणून भाजपने   अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. परमबीर सिंग  आणि रश्मी शुक्ला  भाजपच्या मदतीला आलेले दिसतात.  दोन महिन्यापासून  सत्ताधारी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु […]

Read More

एक ते दीड वर्ष मास्क घालायचाच आहे

             करोना नेहमीसाठी पाहुणा बनून आला आहे.  प्रत्येकाला हे जाणवत होते. तरीही वैताग  होता. केव्हा जाणार करोना?  केव्हा मरणार करोना?   केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज हे  कोडे थोडे उलगडले.   ‘एक ते दीड वर्ष    मास्क तर घालायचाच आहे’ असे जावडेकर म्हणाले.    सुरक्षित अंतर राखायचे आहे,  हात  धुण्याची सवयही ठेवायची आहे असेही त्यांनी सांगितले.  म्हणजे आणखी […]

Read More

अनिल देशमुखांचे ‘काका, मला वाचवा’

सोशल  मिडीयावर आज एक विनोद खूप  व्हायरल  होतोय. ‘कोरोनापासून  तुम्हाला  स्वतःच स्वतःला  वाचवायचे आहे. कारण   सरकार सध्या   स्वतःला  वाचवण्यात व्यस्त आहे.’ विनोदाचा भाग सोडला तरी  परिस्थिती तशीच आहे. मुंबईचे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने     महाआघाडी सरकारमध्ये उडालेली खळबळ  २४ तासानंतरही कायम आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकाल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लावतील’  असे  राष्ट्रवादीतले ‘काका’  […]

Read More

लेटरबॉम्बने उद्धव सरकारमध्ये भूकंप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंग यांनी  राज्यातल्या  महाविकास आघाडी सरकारवर आज लेटरबॉम्ब टाकला.  ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  सचिन वाझेला  दर महिन्याला  १०० कोटी रुपये गोळा करायला सांगितले होते’   अशा मजकुराचे पत्र  परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून   मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.  त्यांनी सोबत पुरावाही जोडला. राज्यपालांनाही ते पत्र पाठवले. ‘हा […]

Read More

‘मोदींचा माणूस’ दत्ताजी होसबळे बनले संघाचे नवे सरकार्यवाह

राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाने कात  टाकली.  तब्बल १२ वर्षानंतर आपला जनरल सेक्रेटरी म्हणजे सरकार्यवाह आज बदलला.    ६५ वर्षे वयाचे कर्नाटकचे दत्तात्रय होसबळे  यांना  सरकार्यवाह निवडले.   ७३ वर्षे वयाचे भय्याजी जोशी यांच्या जागी  ते  आले आहेत.  संघाची दोन दिवसाची  अखिल भारतीय प्रतिनिधी सभा   बेंगळूरू येथे सध्या सुरु आहे. तिच्यात  एकमताने ही निवड झाली. संघात हे एकच पद […]

Read More

राम आला भाजपमध्ये

निवडणुका आल्या की  राजकीय पक्षांना  देवाधर्माची  आठवण होते.  तो पक्ष भाजप असेल तर मग विचारूच नका.  सध्या बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची  रणधुमाळी सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर भाजपने  थेट  रामाला  खेचले आहे. रामानंद  सागर यांच्या ‘रामायण’ ह्या  भयंकर लोकप्रिय टीव्ही मालिकेत  प्रभू श्रीरामाची भूमिका  करणारे  अभिनेते अरुण गोविल  यांनी भाजपमध्ये   प्रवेश केला आहे. हा राम  १९८८ […]

Read More

MNC जळगावमध्येही भाजपला धक्का, महापालिका हातची गेली

भाजपला सध्या राज्यात  ‘बुरे दिन’ सुरु आहेत.  राज्यातली  सत्ता गेल्याला सव्वा वर्ष होत आले आहे.  आता  महापालिकाही हातातून निसटत आहेत.  फोडाफोडीत भाजपचा हात कुणी पकडू शकत नाही. पण आता नगरसेवकही फुटू लागले आहेत.  गेल्या महिन्यात   राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी  सांगली महापालिकेत भाजपचा ‘कार्यक्रम’ केला. आज  जळगाव महापलिकेत  शिवसेनेने   भाजपला दणका  दिला.  […]

Read More